Friday, September 21, 2007

याला काय म्हणावं...

एक कविता ऎकणार?
ऎकु नकोस जा
पानं पुसत शिकरण खा
जेवायला या
यायच्या आधी या
मग जा
मज्जा
फुस्स्स्स्स्...
गुडुप्प झाले...
उडुप्प झाले
आणि शेवटी उडुपी झाले
उडुपी साले
माजलेले
हुह!
म्हणॆ फक्कड
आहे का रोक्कड?
पसरायचे भोकाड
आणि काय?
भलत्याचा नाद
त्यात ऊल्टा पाय
मग काय?
आज काय अन उद्या काय!
बोम्बाबोम्ब, फाटक्यात पाय!
कालचा गोंधळ बरा होता?
आज घ्या सोटा
आणि ऊद्या लोटा
काय म्हणता अजोबा?
ऊद्या आहात का जिवंत?
का रोजच्यासारखेच मरणार?
आज जगुन घ्या
ऊद्याचं पाहु...
आणि हो... परवा पोहे!
आज शिरा...
ऊद्या वडा...
काला घोडा
उन्हात टेढा
काळ्या, ऊभ्या, आडव्या रेघा
ऊल्टा लेंगा
पाचवे बटण
अर्धा दोरा
काळी सुई
टक्कल पडेल
तर शिवुन मिळेल
आणखी काही?
साबुदाणा उद्या
चहा प्यालात?
पैशे टाका
मोजत बसलात
तर मोजणार कधी?
मोजे घाला
मग मोजा...
नाही नाही, उद्या माझी रजा
ऊगाच डोक्याल त्रास
त्यात श्रावण मास
खेळंच खल्लास
हे काय?
चक्क फस्ट कल्लास?
भगवा पेढा
गडकरी रंगायतन
धन, तन, मन
जंतर मन
जन गण मन
न्यायाधीश महोदय
ऊद्या सुट्टी आहे
कालचा गोंधळ बरा होता
कल हो ना हो
ऊद्या पहा
साडे नऊ वाजता
चित्रहार
सॊरी, रिन चित्रहार!

No comments: