Friday, September 21, 2007

भित्रं आभाळ

काळोखाच्या चादरीखाली
नभ अजुन जागंच होतं
टक्क डोळे उघडे टाकुन
शांततेच्या शोधात होतं...

मनात वादळ माजलेलं
दोन-चार गावं उजाडलेली
अन शे-दोनशे शवं - वादळानं पछाडलेली!

एक दिवा मात्र
खांबावर एकटच लटकत होता - फाशी दिलेल्या कैद्याप्रमाणे,
वादळाच्या भोअवर्यात त्याचा प्रकाश
अधनं-मधनं माझ्यापर्यंत सटकत होता.

रात्र अशीच ओसरली...

उजाडलं तेव्हा,
वाकलेल्या खांबावर
दिवा खालीवर झुलत होता
विझलेला...
पण नभाकडे खुणावत होता...

नभ दमल्यासारखं वाटत होतं
एका अनामिक ओझ्याखाली
खंगल्यसारखं वाटत होतं,
एक दोन संतत धारा
नकळत बरसत होतं,
अवजड ढगांचा काळा थवा तेव्हा,
मला जवळच असल्याचं भासत होतं.

No comments: